Articles
गोष्ट दीडशे गाव-ग्रंथालयांची
प्रकाश बापूराव अनभुले प्रकल्प संचालक NELPSPB, प्रगत शिक्षण संस्था, फलटण
आकाशातील शाळा
प्रकाश अनभुले
रोजच्या दैनंदिनीप्रमाणे आमच्या शाळेतील वर्ग सुरु असतात. वर्गात तास सुरु असताना मुलांचा एक गट उठतो आणि तासाला असणाऱ्या शिक्षकाची परवानगी घेऊन वर्गाबाहेर पडतो. जवळच असणाऱ्या एक खोलीचा ताबा घेतो. अतिशय आकर्षक बांधकाम असलेल्या आणि दोन मोठाल्या काचेच्या भिंती असलेला हा वर्ग. आतमध्ये विशिष्ट रचनेत असलेले पाच संगणक. दुरीकडे भिंतीवर मोठी टीव्ही स्क्रीन. मुले टीव्ही स्क्रीन सुरु करतात. मग स्क्रीनला जोडलेला लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन सुरू होते. स्काईपच्या स्क्रीनवरून मुले आपल्या परदेशात बसलेल्या ग्रॅनीचे नाव शोधून व्हिडिओ कॉल सुरु करतात. क्षणात स्क्रीनवर त्यांची लाडकी ग्रॅनी अवकाशातून एखादा जिन अवतरावा तशी अवतरते. अतिशय उत्साहाने मुले स्क्रीनवर दिसणाऱ्या आपल्या ग्रॅनीला भर दुपारी गुड मॉर्निंग अथवा गुड इव्हनिंग किंवा ओला (स्पॅनिश मध्ये हॅलो) म्हणत असतात. ग्रॅनी मुलांना गुड आफ्टरनून म्हणतात तर कधी कधी एखादी ऑस्ट्रेलियातील ग्रॅनी मुलांनी शिकवल्यानुसार नमस्कार किंवा राम राम म्हणते. आणि मग सुरु होते त्यांची आकाशातील शाळा.
प्रमाण आणि प्रमाणेतर भाषा :शिक्षकांची भूमिका
डॉ. मॅक्सीन बर्नसन
भाषा आणि जीवन, मे १९८७ मध्ये प्रकाशित
प्रमाण भाषा म्हणजे नेमकं काय? ती का वापरायची? प्रमाण आणि प्रमाणेतर हे भाषेचे वेगळे प्रकार कसे निर्माण झाले? शिक्षक या नात्याने शाळेतील भाषेबाबत कोणती भूमिका घ्यावी? या आणि अशा इतर अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणारा अभ्यासपूर्ण लेख.
आणि मारुती सापडला . . .
प्रकाश अनभुले
संध्याकाळी शाळेतून परत आलो होतो. घरी आल्यावर थोडे फ्रेश होऊन लगेच इंटरनेट सुरु केले होते. दिवाळीच्या सहलीचे बुकिंग करण्याची जोरदार तयारी सुरु होती. वेगवेगळ्या साईटवरून माहिती चालू होती मधेच फेसबुकवरती आमच्या सहलीची मार्गदर्शक असेलेली माझी मैत्रीण नादियाबरोबर चर्चा सरू होती.
तेवढ्यात आमच्या शेजारच्या ताई एक Pendrive घेऊन आल्या. त्या सांगत होत्या. त्यांचे पती फलटण वरून कोल्हापूरला जाताना मध्ये एका गृहस्थाला लिफ्ट दिली. तो पुढे कोल्हापूरमध्ये उतरला. पण उतरताना तो आपली बॅग मात्र गाडीतच विसरून गेला. त्याचा शोध नंतर घेण्याचा प्रयत्न केला पण तो काही सापडला नाही. त्याच्या बॅगमध्ये भली मोठी अभ्यासाची पुस्तके आणि एक Pendrive होता. त्या पुस्तकांमध्ये कुठे त्याचे नाव नव्हते. फक्त तो विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे आणि काही तरी संशोधनपर अभ्यास करतोय एवढाच बोध होत होता.
Standard and Non-Standard Language: The Teachers Stance
Dr. Maxine Berntsen
What exactly is standard language? What is the need for it? How did standard and non-standard varieties of a language develop? What stance should a teacher have towards the language used in school?
A scholarly article, attempting to answer these and many such questions.
%20%20(1)%20(1)%20(2).jpg)